भारतीय संघाचा विजयरथ सुसाट; विंडीजचा १२५ धावांनी धुव्वा
भारतीय क्रिकेट संघानं विश्वचषक स्पर्धेत आपल्या विजयाची परंपरा कायम राखली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतानं विंडिजचा १२५ धावांनी धुव्वा उडवला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने विंडीजला विजयासाठी २६९ धावांचं आव्हान दिलं होतं.मात्र विंडीजच्या फलंदाजांना हे आव्हान पेलवलं नाही. त्यांचा संपूर्ण डाव ३५ व्या षटकात अवघ्या १४३ धावांत आटोपला.
मोहम्मद शमीने १६ धावा मोजून ४ फलंदाजांना माघारी धाडलं. जसप्रीत बुमरा आणि यजुवेंद्र चहलनं प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, विराट कोहलीनं ८२ चेंडूत ८ चौकारांसह ७२ धावांची खेळी साकारली. त्यासोबतच महेंद्रसिंग धोनीनं ६१ चेंडूत नाबाद ५६ धावा करुन भारताला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली.