अभिनेत्री डिंपल कपाडियांना मातृशोक, बेट्टी कपाडीया यांनी वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

frame अभिनेत्री डिंपल कपाडियांना मातृशोक, बेट्टी कपाडीया यांनी वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Thote Shubham

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या आई बेट्टी कपाडीया यांचे निधन झाले आहे. शनिवारी मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालावली. बेट्टी कपाडीया यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

 

यामुळे काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी रात्री ट्विंकल खन्नाची आजी आणि अभिनेत्री डिंपल कपाडीया यांची आई बेट्टी कपाडिया यांचे निधन झाले.

 

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी अक्षय आणि ट्विंकल यांनी नानी बेट्टी कपाडिया यांचा 80 वा वाढदिवस कुटुंबीयांसह साजरा केला. ट्विंकलने इंस्टाग्रामवर फोटोही शेअर केले आहेत, ज्यात मुलगा आरव, मुलगी नितारा आणि आई डिंपल कपाडिया देखील दिसले होते.

 

 

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More