कोरोनाच्या माहितीसाठी अॅपलने लाँच केली वेबसाईट आणि अॅप
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. याच पार्श्वभुमीवर लोकांपर्यंत या व्हायरसची योग्य माहिती पोहचण्यासाठी टेक कंपनी अॅपलने कोव्हिड-19 स्क्रिनिंग साइट आणि मोबाईल अॅप लाँच केला आहे. या अॅपची खास गोष्ट म्हणजे सीडीसी म्हणजेच सेंटर फॉर डिसीज कंट्रोलसोबत जोडलेले आहे. स्क्रिनिंग टूल देखील युजर्सला कोरोना व्हायरस संबंधित माहिती देत जागृक करेल.
फोर्स आणि फेमासोबत भागिदारी केली आहे. युजर्स या प्लॅटफॉर्मवर कोरोना व्हायरस संदर्भात प्रश्न विचारू शकतात व सीडीसीचे विशेषज्ञ याची उत्तरे देतील. या प्लॅटफॉर्म युजर्सला कोरोना व्हायरससंदर्भात सर्व माहिती मिळेल.
अॅपलनुसार, सिरीला कोरोना व्हायरस संदर्भात माहिती नाही. सिरीला या संदर्भात माहिती विचारल्यावर सिरीने सीडीसीशी संबंधित माहिती दिली होती. याशिवाय सिरीने अॅप स्टोरवरून टेलीहेल्थ अॅप डाउनलोड करण्यास सांगितले होते.