कायद्यात संशोधनाची गरज आहे – उज्वल निकम

Thote Shubham

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणी चारही दोषींना आज तिहार तुरुंगात फाशी दिली गेली. तिहार तुरुंगात एकाचवेळी चार जणांना फासावर चढविण्याची ही पहिलीच घटना आहे. तिहारच्या तुरुंगाच्या क्रमांक तीनमध्ये आज ही फाशी दिली गेली. फाशीसाठी बिहारच्या बक्सरमधून दोर मागवण्यात आले होते.

 

दोषींना फाशी देण्याचा पाच मार्च रोजी चौथे ‘डेथ ‌वॉरंट’ काढताना न्यायालयाने २० मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता फाशीची वेळ निश्चित केली होती. आरोपींच्या फाशीनंतर देशात आनंदाच वातावरण आहे. उशीर झाला पण न्याय झाला असा एकच विचार सगळ्यांच्या मनात आहे. “आज आमचा विजय आहे , माझ्या मुलीला न्याय मिळाला अशी प्रतिक्रीया निर्भयाच्या आई -वडिलांनी दिली. तर सरकारी वकील उज्वल निकम यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे.

 

फाशीच्या एक तास आधी दोषीला अंघोळ करण्यास सांगितले जाते. त्यानंतर त्याला नवे कपडे दिले जातात. कोठडीतून बाहेर पडल्यानंतर त्याचा चेहरा काळ्या कापडाने झाकला जातो. दोन्ही हात मागे बांधले जातात. ज्या ठिकाणी फासावर लटवले जाणार आहे तिथे नेले जाते. त्याच्या भावना जाणून घेतल्या जातात. ही प्रक्रिया सुरू असते तेव्हा कारागृहातल्या अन्य कैद्यांना कोठडीतच ठेवले जाते. त्यांना बाहेर येण्यास मनाई असते.

 

फाशी देताना तुरुंग अधीक्षक आणि उपअधीक्षकांची उपस्थिती अनिवार्य असते. त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतो. प्रत्यक्ष फाशी देताना नातेवाईकांना उपस्थित राहण्यास मनाई असते. संशोधक, मनोवैज्ञानिक यावेळी तुरुंग अधिक्षकांच्या परवानगीने उपस्थित राहू शकतात. जल्लादाच्या साहाय्याने फाशी दिली जाते. आदेश येताच संदुक ओढला जातो व आरोपीला फासावर लटकवण्यात येते. हा मृतदेह जवळपास अर्धा तास तशाच स्थितीत लटकवण्यात येतो. त्यानंतर खाली उतरवून त्याची तपासणी वैद्यकीय अधिका-यांमार्फत होते. तो मृत झाल्याची खात्री केल्यानंतर मृतदेह कैद्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला जातो.

 

 

 

Find Out More:

Related Articles: