रिअलमीचा नार्झो स्मार्टफोन २६ मार्चला लाँच
चीनी स्मार्टफोन कंपनी रियलमी भारतात त्यांची नवी स्मार्टफोन सिरीज नार्झो १० व नार्झो १० ए येत्या २६ मार्च रोजी लाँच करत आहे. काही दिवसापूर्वी नार्झोचा टीझर कंपनीने जारी केला होता आणि त्यामुळे ग्राहकात या फोन बद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.
टिप्सटर ईशान अग्रवाल यांनी रियलमीचा हा नवा फोन रिटेल स्टोर मध्ये स्पॉट केला असून त्याचा फोटो शेअर केला आहे. नार्झो १० म्यानमार मध्ये लाँच झालेल्या रियलमी ६ आयचा रीब्रांड आहे तर १० ए थायलंड मध्ये लाँच केलेल्या सी ३ चे रीब्रांड व्हर्जन आहे. या फोनला पाच हजार एएमएच बॅटरी दिली गेली आहे. या फोनच्या किमती १५ हजारापेक्षा कमी असल्याचेही समजते. अन्य फिचर मध्ये फोनला ६.५ इंची डिस्प्ले, ४ रिअर कॅमेरे, पैकी प्रायमरी कॅमेरा ४८ एमपीचा तर सेल्फी साठी १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. मिडीया टेक हिलीयो जी ८० प्रोसेसर, १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट, युएसबी सी पोर्ट दिले गेले आहे. कंपनीने सिरीज स्मार्टफोनचे डेडीकेटेड पेज जारी केले आहे.