फोडाफोडीचे राजकारण तुम्ही केले, आम्हाला दोष देऊ नका : माधव भांडारी

Thote Shubham

पवारसाहेब, तुमची मोट फुटली. पूर्वी आपल्याकडे आलेली माणसे तुम्हाला सांभाळता आली नाहीत. फोडाफोडीचे राजकारण तुम्ही केले. म्हणून आम्हाला दोष देऊ नका, अशी टीका भाजपचे प्रदेश प्रवक्‍ते माधव भांडारी यांनी राजगुरूनगर येथे केली.

खेड तालुका भाजपच्यावतीने विजय संकल्प बूथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भांडारी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे तालुका अध्यक्ष अतुल देशमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, राजगुरूनगर नगर परिषदेचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, भाऊसाहेब फुरसुंगीकर, आरपीआयचे जिल्हा संपर्क प्रमुख संतोषनाना डोळस, अविनाश भवरे, संजय घुंडरे, राजन परदेशी, ताराचंद कराळे, संदीप रासकर, सुनील सैदाने, रामदास मेदनकर, कालिदास वाडेकर, चांगदेव शिवेकर,किरण झिंझुरके, काळुराम पिंजन, राजगुरूनगर व आळंदीचे नगरसेवक, तालुक्‍यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माधव भांडारी म्हणाले, गड किल्ल्यांबाबत भाजपच्या भूमिकेवर शरद पवार यांनी रान उठवले आहे; मात्र ते कितीवेळा रायगावडावर गेले याचे उत्तर द्यावे. 60 ते 65 वर्षे कॉंग्रेससरकारने राजकारण केले; मात्र देशातील गरिबी हटवता आली नाही. जनतेला अंधारात ठेवले. आता सत्तेपासून दूर झाल्याने ओरड सुरू केली आहे. मोदी सरकारने 105 दिवसांत 134 योजना सर्वसामान्य जनतेला दिल्या आहेत. याचा 32 कोटी कुटुंबाला लाभ झाला आहे. शिवाजी मांदाळे म्हणाले की, यावेळी खेड-आळंदी विधानसभेची जागा भाजपला सोडण्याची मागणी केली.भाजपचा आमदार होईल.


Find Out More:

Related Articles: