
नोकियाच्या फीचर फोनमध्ये मिळणार अँड्राईड OS
एचएमडी ग्लोबल लवकरच नोकिया 8.2, नोकिया 5.2 आणि नोकिया 1.3 स्मार्टफोन लाँच करणार आहे. यासोबतच कंपनी एक फीचर फोन देखील सादर करणार असून, या फोनमध्ये अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टम मिळेल.
काही दिवसांपुर्वीच या फीचर फोनला नोकिया टीए-1212 नावाने एका वेबसाईटवर पाहण्यात आले होते. कंपनीने मात्र अद्याप या फोनच्या लाँचिंगबद्दल काहीही माहिती दिलेली नाही.
लीक झालेल्या माहितीनुसार, नोकियाच्या या फीचर फोनचे वजन 88 ग्रॅम असेल. यामध्ये 4जी नेटवर्क सपोर्ट मिळेल. या फीचर फोनची साईज 123.8 x 52.4 x 13.1 एमएम असेल.
नोकियाच्या या फोनमध्ये 2.4 इंच डिस्प्ले देण्यात येईल, ज्याचे रिजॉल्यूशन 240 x 320 पिक्सल असेल. सोबतच चांगल्या परफॉर्मेंससाठी यात 8 एमबी रॅम + 16 जीबी स्टोरेज देण्यात येईल. हा फोन अँड्राईड सिस्टमवर चालेल. या फोनची खरी किंमत व स्पेसिफिकेशनबद्दल अधिक माहिती लाँचिंगनंतरच मिळेल.