आता थेट टिव्हीद्वारे करा व्हिडीओ कॉलिंग, जिओने आणला खास कॅमेरा

frame आता थेट टिव्हीद्वारे करा व्हिडीओ कॉलिंग, जिओने आणला खास कॅमेरा

Thote Shubham

रिलायन्स जिओने जिओ टिव्ही कॅमेरा सादर केला आहे. जिओ फायबरच्या लाँचिंग दरम्यानच जिओने स्पष्ट केले होते की जिओ फायबर्सचे युजर्स सेटटॉप बॉक्सद्वारे व्हिडीओ कॉलिंग करू शकतील. जिओ टिव्ही कॅमेरा एक लहानसे डिव्हाईस असून, जे टिव्हीशी कनेक्ट करता येईल. डिव्हाईस कनेक्ट केल्यानंतर तुम्ही थेट टिव्हीवरून व्हिडीओ कॉलिंग करू शकता. जिओ टिव्ही कॅमेरा जिओच्या वेबसाईटवरून खरेदी करता येईल. याची किंमत 2,999 रुपये आहे.

 

हफ्त्यांवर देखील हा कॅमेरा खरेदी करता येईल व तीन दिवसात या कॅमेऱ्याची डिलिव्हरी करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या कॅमेऱ्यावर 1 वर्षांची वॉरंटी देण्यात आली असून, कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास 7 दिवसात रिप्लेस देखील करता येणार आहे.

 

जिओ टिव्ही कॅमेऱ्याला टिव्हीमध्ये एका केबलद्वारे कनेक्ट करता येईल. यानंतर कॅमेऱ्याला टिव्हीच्या वरती ठेवावे लागेल. हा कॅमेरा सध्या केवळ जिओ फायबर ग्राहकांसाठीच आहे. या कॅमेरा 120 डिग्री वाइंड अँगल असून, याचे वजन 93 ग्रॅम आहे.

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More