कनिका कपूरमुळे दक्षिण आफ्रिकन क्रिकेट टीम क्वारंटाईन

Thote Shubham
मुंबई : कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाच्य रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नुकतेच बॉलिवूड गायक कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे कनिकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट टीमला क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचेही वाढलं आहे.

कनिका कपूर परदेशातून भारतात परतल्यानंतर ती लखनऊमधील एका पंचतारांकित हॉटेलमधील एका पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी तिने अनेकांसोबत भेटीगाठी घेतल्या होत्या. पार्टीनंतर कनिका याच हॉटेलमध्ये राहिली होती. याच दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट टीमचाही येथे मुक्काम होता.


दक्षिण आफ्रिका आणि भारतामध्ये तीन दिवसीय वनडे मालिका खेळवण्यात येणार होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही मालिका रद्द करण्यात आली आहे. तर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये या मालिकेचा दुसरा वन डे सामना लखनऊमध्ये होणार होता. मात्र तो रद्द झाल्यानंतर ही टीम मायदेशी परतली आहे आणि तिथे आता हे सगळे खेळाडू क्वारंटाईनमध्ये आहेत.


दरम्यान, कनिका कपूरला कोरनाची लागण झाल्यामुळे संपूर्ण देशात आणि बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. कनिकाच्या पॉझिटिव्ह अहवालानंतर तिच्या संपर्कात आलेल्या अनेक दिग्गज नेत्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले होते. विशेष म्हणजे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही स्वत:ची टेस्ट केली. पण त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले.

Find Out More:

Related Articles: