ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दारुण पराभव
भारत आणि ऑस्ट्रेलिया मधील एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स राखून विजय मिळवत भारताचा दारुण पराभव केला. सलामीवीर डेविड वॉर्नर आणि कर्णधार अरोन फिंच यांच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला.
ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरने ११२ चेंडूत नाबाद १२८ धावा केल्या, तर फिंच १४४ चेंडूत ११० धावा करून नाबाद राहिला. त्यामुळे दोन्ही सलामीवीर डेविड वॉर्नर आणि कर्णधार फिंच यांच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना सहज जिंकला.
डेविड वॉर्नरने आपल्या खेळीत ११२ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकार लगावत नाबाद १२८ धावा केल्या. तर फिंचने ११४ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकार लगावत ११० धावा केल्या. दोन्ही खेळाडूंच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३७.४ षटकांत विजय मिळवला .
भारतीय गोलंदाजांनी खूप प्रयत्न करूनही डेविड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांची पार्टनरशीप तोडण्यात अयशस्वी ठरले. आणि औस्त्रेलिअने सामना सहज खिशात घातला.
या पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताकडून फलंदाजीसाठी मैदानात उतरलेले सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची जोडी चांगली सुरवात देण्यास अपयशी ठरली . सलामीवीर शिखर धवनच्या ७४ धावांच्या जोरावर भारताला २५५ धावांपर्यांत मजल मारता आली.
सलामीवीर रोहित शर्माला मुंबईतल्या घरच्या मैदानात मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या १० धावा करुन माघारी परतला. त्यानंतर धवन आणि के एल राहुलने डाव सांभाळला. शिखर धवनने ९१ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकार लगावत ७४ धावांची खेळी केली. तर के एल राहुलने ६१ चेंडूत ४ चौकार लगावत ४७ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार विराट कोहली १६ धावा करुन माघारी परतला. ऋषभ पंत २८ तर रवींद्र जडेजाने २५ धावांची खेळी केली. तर, श्रेयस अय्यर ४ , पंत २८ धावा करुन बाद झाले. अवघ्या ४९.१ षटकात भारतीय संघ सर्व बाद झाला.
ऑस्ट्रेलिया कडून स्टार्कने ३ ,कम्मिंन्स २ , केन रिचर्डसन २ झाम्पा आणि एगर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवले. ऑस्ट्रलियाच्या गोलंदाजांनी अचूक मारा केल्याने भारतीय संघाला सर्वबाद अवघ्या २५५ धावा करता आल्या.