असे होणार आहेत टीम इंडियाचे बांगलादेश विरुद्ध टी२०, कसोटी सामने

Thote Shubham

आजपासून (3 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यानंतर दुसरा टी20 सामना 7 नोव्हेंबरला राजकोट येथे आणि तिसरा सामना 10 नोव्हेंबरला नागपुरमध्ये होणार आहे.

त्यानंतर 14 नोव्हेंबरपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ही कसोटी मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपचा देखील भाग असणार आहे.

या कसोटी मालिकेतील 14 ते18 नोव्हेंबर दरम्यान होणारा पहिला कसोटी सामना इंदोरला होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान होणारा कसोटी सामना कोलकाताला इडन गार्डनवर खेळवला जाणार आहे.

विशेष म्हणजे 22 नोव्हेंबरपासून सुरु होणारा दुसरा कसोटी सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे.

भारत-बांगलादेश संघात उद्यापासून सुरु होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला(Virat Kohli) विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत रोहित शर्मा(Rohit Sharma) भारताचे नेतृत्व करणार आहे. पण टी20 मालिकेनंतर सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत मात्र विराटच भारतीय संघाचे नेतृत्व करेल.

बांगलादेशचे टी20 मालिकेत महमूदुल्लाह नेतृत्व करणार आहे. तर कसोटी मालिकेत मोमिनुल हक कर्णधार असेल.

टी20 मालिका –

3 नोव्हेंबर – पहिला टी20 सामना – दिल्ली (वेळ – संध्याकाळी 7.00 वाजता)

7 नोव्हेंबर – दुसरा टी20 सामना –  राजकोट (वेळ – संध्याकाळी 7.00 वाजता)

10 नोव्हेंबर – तिसरा टी20 सामना – नागपूर (वेळ – संध्याकाळी 7.00 वाजता)

कसोटी मालिका –

14-18 नोव्हेंबर – पहिली कसोटी – इंदोर (वेळ – सकाळी 9.30 वाजता)

22-26 नोव्हेंबर – दुसरी कसोटी – कोलकता (वेळ – दुपारी 1 वाजता)

टी20 मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघांचे खेळाडू –

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर.

बांगलादेश – सौम्य सरकार, मोहम्मद नाईम, महमूदुल्लाह (कर्णधार), आफिफ हुसेन, मोसाद्दक हुसेन, अनीमुल इस्लाम, लिटन दास, मुश्फिकुर रहीम, अराफत सनी, अल-अमीन हुसेन, मुस्तफिजुर रहमान, शैफुल इस्लाम, अबू हैदर रोनी, मोहम्मद मिथुन, तैजुल इस्लाम.

कसोटी मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघांचे खेळाडू –

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल, रिषभ पंत

बांगलादेश – शादमन इस्लाम, इमरुल कायस, सैफ हसन, मोमिनुल हक (कर्णधार), लिटन दास, मुश्फिकुर रहीम, महमुदुल्ला, मोहम्मद मिथुन, मोसाद्दक हुसेन, मेहिदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, मुस्तफिजुर रहमान, अल अमीन हुसेन, एबादोत हुसेन.




Find Out More:

Related Articles: