“विझणाऱ्या चुली, वाढती बेरोजगारी आणि कामगारांच्या आत्महत्या वाढल्या तर कसं व्हायचं?”

Thote Shubham
देशात कालपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय होता. यामध्ये आता रोजंदारीवर काम करणाऱ्यांची भर पडली आहे. विझणाऱ्या चुली, वाढती बेरोजगारी आणि कामगारांच्या आत्महत्या वाढल्या तर कसं व्हायचं?, असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की, 21 व्या शतकात भारताची वाटचाल ‘नॉलेज इकॉनॉमी’च्या दिशेने सुरू आहे. त्यांच्या या विश्वासाबद्दल दुमत नाही परंतू अर्थव्यवस्थेचा घात, रोजगारावर आघात या कारणांमुळे कामगारांची पावले आत्महत्येच्या दिशेन पडू लागली तर कसं व्हायचं, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

2019 वर्षात देशात रोजंदारीवर काम  करणाऱ्या मजुरांच्या आत्महत्यांमध्ये 23.4 टक्याने वाढ झाली आहे. तर गेल्या तिमाहीत जीडीपीमध्ये उणे 23.9 टक्के इतकी ऐतिहासिक घसरण झाली आहे. लॉकडाऊमुळे जवळजवळ 14 कोटी लोकांचा रोजगार गेला असल्याचं अग्रलेखात सांगितलं आहे.

दरम्यान, रूग्णालयातील रूग्णाला जशी उपचाराची गरज असते तशीच गरज देशाच्या आजारी अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस देण्याची गरज असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.


Find Out More:

Related Articles: