१५ एप्रिलनंतर खऱ्या अर्थाने कोरोनाशी लढा सुरु होईल - नरेंद्र मोदी

Thote Shubham
मुंबई : ”राज्य सरकारांनी 15 एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्य्याटप्य्याने याचे नियोजन करावे व कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे असे समजून लोक रस्त्यावर येतील, असे कोणतेही निर्णय घेऊ नका, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना केली.


देशात राज्यातील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर काय करावं? याच्या सूचना सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत.


यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, ‘ लॉकडाऊन संपविल्यानंतर 15 एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्याटप्याने लोक, वसाहती भाग सुरु करण्याकडे लक्ष द्या. देशातील कोरोनाबाधित बरे होत असले तरी १५ एप्रिलनंतर लॉकडाऊन संपल्यानंतर खऱ्या अर्थाने आत्ता लढाई सुरु होणार आहे.

लॉकडाऊन संपले म्हणजे संकट टळले असे नाही. त्यानंतरही आपल्याला सोशल डिस्टनसिंग किंवा सामाजिक अंतर राखायचे आहे. त्यासाठी मास्क वापरा. घरगुती स्वच्छ कपड्याचा मास्क म्हणून उपयोग करा. 21 दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका. अशा विविध सुचना त्यांनी यावेळी दिल्या.

तसेच कोरोनाविरुद्धचा हा लढा सुरूच राहणार आहे.पण शांती, सद्भाव, एकता राखणे महत्वाचे आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहील, याकडे लक्ष द्या. त्यासाठी ड्रोन वगैरे तंत्रज्ञानांचा उपयोग करा.

कोरोनाचा मुकाबला हा फक्त डॉक्टरांचा नसून एनसीसी, स्वयंसेवी संस्थांचे तरुण तडफदार युवक यांनाही सहभागी करून घ्या.त्याचप्रमाणे, निवृत्त अधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती, तज्ज्ञ यांचे टास्क फोर्स तयार करा. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्या. असेही पंतप्रधानांनी सूचित केले.

Find Out More:

Related Articles: