निर्भया प्रकरण ; अखेर ‘न्याय’ मिळाला : नवनीत राणा

Thote Shubham

मुंबई : निर्भया प्रकरणातील चार दोषींना आज फाशीची शिक्षा देण्यात आली. दोषींच्या फाशीपूर्वी तुरूंगाबाहेर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तब्बल ७ वर्ष ३ महिन्यांनंतर आज निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

 

याच पार्श्वभूमीवर खासदार नवनीत कौर राणा म्हणाल्या की, एक भारतीय महिला म्हणून मी आभार मानते, गेल्या साडेसात वर्षापासून निर्भयाचे आई-वडील हिंमतीने ही लढाई लढले,’ अशी भावना त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘संपूर्ण देश या निर्णयाची वाट पाहत होता. अखेर ‘न्याय’ मिळाला.

 

माझ्या देशात महिलांना न्याय मिळतो याचा मला अभिमान आहे,’ अशा भावना त्यांनी याबाबत व्यक्त केल्या. दरम्यान, देशभरात अशाप्रकारची जी प्रकरणं आहेत ती सगळी जलदगतीने ३ महिन्यात सोडवून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. यातील आरोपींना फाशी देण्यात यावी ही अपेक्षा आहे,’ असं मत त्यांनी व्यक्त केले.                                                                                                                                              

Find Out More:

Related Articles: