बेळगाव प्रश्नावर उद्धव ठाकरेंसोबत शरद पवारांनी येडीयुरप्पांशी चर्चा करावी - संजय राऊत

Thote Shubham

बेळगाव चर्चेत शरद पवार यांचाही महत्त्वाचा वाटा राहिल, त्यांनी विरोधी पक्षनेते असताना पाठीवर काठ्या खाल्ल्या आहेत. अंतिम निर्णय होऊपर्यंत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून काही उपाययोजना कराव्यात, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

 

ते बेळगाव येथे पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्रातही कानडी लोक राहतात. तरिही महाराष्ट्राने नेहमी त्यांना मदतच केली आहे. मात्र, बेळगावमध्ये मराठी नाटकांवर अधिक कर लादण्याचा प्रकार होत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.

 

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘न्यायालयाच्या जो निकाल लागेल तो लागेल. मात्र सध्या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन या विषयावर चर्चा झाली पाहिजे. न्यायालयाचा जो निकाल लागेल त्याच्यात किती पिढ्या अजून जातील ते सांगता येत नाही. मी सतत सांगेन की, दोन मुख्यमंत्र्यांनीच या संदर्भात चर्चा करुन मार्ग काढावा. या देशामध्ये लोकशाही आहे. शेवटी चर्चेतून विषय सूटावा,’ अशी मागणी राऊत यांनी केली.

 

दरम्यान, मराठी भाषिक देशाचेच नागरिक आहेत. या क्षणी ते कर्नाटक राज्याचे नागरिक आहेत. त्यांची देखभाल करणं हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे. तसेच राम मंदिरावर न्यायालयाने अंतिम निर्णय दिला, तसा सीमावादावरही न्यायालयानेच निर्णय द्यावा, असे ते म्हणाले.

 

Find Out More:

Related Articles: