राजकारणाशी संघाचा काहीही संबंध नाही – मोहन भागवत

Thote Shubham

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजकारणाशी काही संबंध नाही, अस सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितल आहे. मोरादाबाद येथे झालेल्या संघ शिक्षण समारोप सभेत बोलताना भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

 

संघ ही राजकीय संघटना नाही व राजकारणाशी संघाचा काहीही संबंध नाही. देशातील नैतिक, सांस्कृतिक व मानवी मूल्ये वृद्धिंगत करण्यासाठी काम करणारी ती एक संघटना आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांशी संबंधित लोक संघात आहेत व त्यापैकी काहीजण राजकारणातही आहेत अस मोहन भागवत म्हणाले आहेत.

 

दरम्यान, एखादी विचारसरणी सर्वदूर पसरून सर्वमान्य होण्यासाठी सत्तेचेही महत्व आहे, असे सांगून भागवत यांनी सत्तेला बुद्धिमत्ता व आध्यात्माची जोड देण्याच्या स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणुकीचे स्मरण दिले. हे लक्षात घेऊन सर्वांनी बलवान, समृद्ध व आरोग्यसंपन्न होण्यासाठी झटावे, असे त्यांनी आवाहन केले.

 

भागवत असेही म्हणाले की, उच्च कोटीचे कित्येक बुद्धिवंत व समाज सुधारक हे संघाशी औपचारिकपणे संलग्न नाहीत, पण त्यांची आणि आमची विचारसरणी एकच आहे. या संदर्भात त्यांनी भूदान चळवळीचे नेते आचार्य विनोबा भावे व संघाचे संस्थापक गोळवलकर गुरुजी यांच्यातील घनिष्ट मैत्रीचे उदाहरण दिले.                                                                            

 

 

Find Out More:

Related Articles: