बाळासाहेबांच्या स्मारकासाठी तब्बल 5 हजार झाडांची होणार कत्तल

Thote Shubham

औरंगाबाद : आरे कॉलनीतील वृक्षतोडीचा विरोध करणाऱ्या देणाऱ्या शिवसेनेचा दुटप्पीपणा आता औरंगाबादमधील 17 एकरचे प्रियदर्शिनी उद्यान उघड करत आहे. या परिसरातील झाडे जाळली जात असताना, कापली जात असताना शिवसेनेची सत्ता असलेल्या पालिकेने मौन बाळगले आहे. परिसरातील झाडे आणि जैवविविधता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी धोक्यात आल्यामुळे आरेचा न्याय प्रियदर्शनी उद्यानाला मिळेल का? असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.

 

पर्यावरणप्रेमींचे औरंगाबाद शहरातील प्रियदर्शनी उद्यान हे आवडते ठिकाण असून लोकांना तासनतास या उद्यानात फिरावसे वाटते. येथे शहरातील सर्वात शुद्ध हवा आहे. या उद्यानाला ऑक्सिजन शहरातील लोक हब म्हणतात. 70 हून जास्त प्रजातींचे पक्षी, 40 प्रकारची फुलपाखरे, सरपटणारे जीव आणि आकाशाला स्पर्श करु इच्छिणारी उंच झाडे या उद्यानात आहेत. पण सध्याच्या घडीला या उद्यानाचे निम्मं राहिलेले वैभव दिसत आहे. सिडकोकडून मनपाच्या ताब्यात या उद्यानाची जागा आली आणि त्यानंतर या उद्यानातील 443 झाडे प्रस्तावित आहेत.

 

प्रियदर्शनी उद्यानात बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभे करायचे असेल, तर किमान पाच हजार झाडांची कत्तल करावी लागणार असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. पर्यावरण प्रेमींनी या मनमानीविरुद्ध आवाज उठवला आहे. सकारात्मक आंदोलन ग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातून सुरु झाले आहे. झाडे वाचवण्यासाठी आंदोलनात 6 वर्षांच्या मुलांपासून ते साठीतील आजोबाही सहभागी झाले. दरम्यान, भर उन्हात झाडे उद्यान विभागाच्या कृपेने पाण्याअभावी काळी पडत होती, मरत होती. हे पाहून पर्यावरणप्रेमींनी वॉक अँड वॉटर (#WalkAndWater) हा अभिनव उपक्रम हाती घेतल्यामुळे अनेक झाडे वाचली.

 

दरम्यान, याप्रकरणी जनहित याचिका दाखल झाल्यानंतर मनपाने दुष्काळाचे कारण देत झाडे कमी झाल्याचे स्वतःच मान्य केले. पण उद्यान विभागाने याच कथित पाणी टंचाईच्या तीन वर्षांच्या काळात शहरात 66 हजार 69 झाडे लावली कशी? असा सवाल उपस्थित झाला आहे. भर उन्हाळ्यात स्थानिक लोकांनी, पर्यावरण प्रेमींनी स्वतः पाणी घालून झाडे वाचवली, लहान-मोठे बांधारे पावसाळ्यात बांधले, स्वच्छता केली तरी देखील महापालिकेला पाझर फुटला नाहीच.

Find Out More:

Related Articles: