उद्धव ठाकरेंनी आघाडीचे नेतृत्व स्विकारणे अभिनंदनाची गोष्ट - अमोल कोल्हे

frame उद्धव ठाकरेंनी आघाडीचे नेतृत्व स्विकारणे अभिनंदनाची गोष्ट - अमोल कोल्हे

Thote Shubham

मुंबई – फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तासंघर्षाला पुर्णविराम मिळाला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापना करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आघाडीच्या नेतेपदी निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले.

 

त्यामुळे राज्याचे उद्धव ठाकरे हे नवे मुख्यमंत्री बनतील. गुरुवारी शिवाजी पार्कवर त्यांचा शपथविधी होणार आहे. त्यातच आता यावर शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिकिया दिली असून या निर्णयाचे त्यांनी कौतुक केले आहे.

 

यावर प्रतिक्रिया देताना खासदार अमोल कोल्हे यांनी, नक्कीच ही आनंदाची गोष्ट असून जी आघाडी पवारांच्या मार्गदर्शनासाठी स्थापन झाली आहे, ती महाराष्ट्राच्या हिताची आहे. स्थिर सरकारची महाराष्ट्राला गरज असून जो शेतकरी, तरुणांचे प्रश्न सोडवेल. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचे नेतृत्व स्विकारणे अभिनंदनाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा निर्णय ठरणार आहे याबाबत माझ्या मनात शंका नसल्याचा विश्वासही अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.                                                                                                                                                                 

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More