
मारुती सुझुकीने सादर केली कॉन्सेप्ट कार ‘फ्यूचरो-ई’
कार कंपनी मारुती सुझुकीने ऑटो एक्स्पो 2020 मध्ये आपली कॉन्सेप्ट कार फ्यूचरो-ई वरून पडदा उठवला आहे. या कारमध्ये कंपनीने भविष्यात येणाऱ्या कार्सच्या स्टायलिंगची झलक दाखवली आहे. या कॉन्सेप्ट कारसोबतच मारुतीने मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली एंट्री केली आहे.
फ्यूचरो-ई मध्ये मिडसाइज एसयूव्हीपेक्षा हटके डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. रिअर विंडस्क्रीन या कारला स्पोर्टी लूक देते. यासोबतच आकर्षक ग्लासहाउस आणि जाड सी-पिलर या एसयूव्हीला अधिक शानदार बनवते. समोरून ही कॉन्सेप्ट कार खूपच बोल्ड दिसते व मागून लांब व पातळ टेललाइट खूपच हटके आहे.
या कारचे इंटरेरिअर देखील मॉर्डन आहे. डॅशबोर्डवर मोठी स्क्रीन देण्यात आलेली आहे. फ्यूचरिस्टिक स्टेअरिंगच्या पुढे डिस्प्ले मिळेल. ज्यात ड्रायव्हर्स आणि इंटेरिअरसाठी कंट्रोल्स आहे. या कूप-स्टाइल एसयूव्हीमध्ये अँम्बिएंट लायटिंग देखील मिलेल. या कॉन्सेप्ट कारला 4 सीटर पर्यायासह सादर करण्यात आले आहे.
हा कार इलेक्ट्रिक एसयूव्ही कॉन्सेप्ट असू शकते. कंपनीने दावा केला आहे की एसयूव्ही कूप कॉन्सेप्ट हायब्रिट आणि प्यूर इलेक्ट्रिक सारख्या पॉवरट्रेन पर्यायसह भविष्यासाठी तयार आहे. मात्र या कॉन्सेप्ट एसयूव्हीच्या प्रोडक्शन व्हर्जनला पेट्रोल इंजिनसोबत बाजारात आणण्यात येणार आहे. सोबत कंपनी यात डिझेल इंजिन देखील देऊ शकते.
या एसयूव्हीचे प्रोडक्शन कधी सुरु होईल, याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही