
लग्न करण्यासाठी मन मोठे हवे- शाहरुख खान
अॅसीड हल्ल्याने पिडीत असलेली अनुपमा हिला बॉलीवूडच्या किंगने लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचे धाडस आणि सहनशक्ती अतिशय कमाल असून तिने या धक्क्यातून सावरून स्वताला खंबीर केले असे मत मांडत शाहरुखने आपल्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत अनुपमाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शाहरुख निर्मित ‘मीर फौंडेशन’च्या ट्विटर पेजवर देखील अनुपमाला शुभेच्छा देणारा संदेश शेअर करण्यात आला आहे.
मीर फौंडेशन’मार्फत शाहरुख खान आणि त्याची संघटना अॅसीड हल्ला झालेल्या पीडितांना मानसिक आणि आर्थिक मदत करत त्यांना पुन्हा समाजात मान उंच करून जगता येईल यासाठी मदत करते. जगदीप आणि अनुपमा यांची जोडी नेहमी आनंदी राहावी आणि यांनी जीवनाचा खरा आनंद घ्यावा असे म्हणत शाहरुखने या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दिवसेंदिवस होणारे अॅसीड हल्ले हे समाजासाठी अतिशय वेदना देणाऱ्या घटना आहेत. त्यामुळे या हल्ल्यातील पीडितांना मदत करणे आणि समाजात परत स्थान मिळवून देण्यासाठी शाहरुख खान याने मीर फौंडेशनची सुरुवात केली आहे. या फौंडेशनच्या माध्यमातून शाहरुख आणि त्याची संघटना अॅसीड हल्ला झालेल्या पीडितांना हवी तशी मदत करत त्यांना समाजात परत स्वावलंबी उमे करण्यास मदत करते.