
माजी मुख्यमंत्र्यांबद्दल काही विचारु नका - संजय राऊत
असं संजय राऊत म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनी राऊतांनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केलं.
‘बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल, जे आजवर झालं नाही ते सर्व महाराष्ट्रात होईल, क्रांती होईल, संपूर्ण महाराष्ट्रात भगवा फडकणार’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. संजय राऊत दिल्लीला जाण्यासाठी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाहून रवाना झाले, त्यानंतर देवेंद्र फडणवीस तिथे दाखल झाले.