शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ सर्व्हेक्षण करावेत – रामदास कदम

Thote Shubham

नांदेड : परतीच्या प्रवासात पावसाने तालुक्यात शेतीचे खूप माेठे नुकसान केले असून हाता-ताेंडावर आलेले पीक गेल्याने शेतकरी पुरता खचत आहे. अशा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आपण कटीबद्ध असून अधिकारी व कर्मचा-यांनी तात्काळ पीकांचे पंचनामे करावेत अशा सूचनापालकमंत्री रामदास भाई कदम यांनी दिल्या.

सलगरा फाटा ता.मुखेड येथे मन्याडीच्या नदीकाठावर व परिससरात आलेल्या पुरामुळे व सततच्या पावसामुळे उभे पीक पाण्याखाली गेल्यामुळे पीकांचे व जमीनीचे माेठे नुकसान झाले आहे.

रविवारी (ता. 3) रामदास कदम यांच्या सह जिल्हाधिकारी अरूण डाेंगरे , मुख्य कार्यकारी अधिकारी अशाेक काकडे , आमदार राम पाटील राताेळीकर , बालाजी कल्याणकर , सुभाष साबणे , तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर उपस्थिती हाेती.

रामदास कदम म्हणाले, परतीच्या पावसाने शेतक-यांचे खूप नुकसान केले आहे. पंतप्रधान राष्ट्रीय पीक विमा याेजनेच्या जाेखमीसाठी शेतक-यांना भरीव मदत मिळावी यासाठी संबंधित विमा कंपनीच्या अधिका-यांनी जायमाेक्यावर जाऊन पाहणी करावी तसेच कृषी विभागाच्या अधिका-यांनी शेतक-यांना येणा-या संभाव्य ऑनलाइनअडचणी पाहता त्यांना सहकार्य करावे असे आवाहनही पालकमंत्री ना. रामदास कदम यांनी केले.                                                                          


Find Out More:

Related Articles: