'चला हवा येऊ द्या' फेम अरविंद जगतात शरद पवारांवर म्हणतात...

Thote Shubham

शुक्रवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर एकच चर्चा होती आणि ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची. शरद पवार यांनी वयाच्या 79 व्या वर्षी साताऱ्यात भर पावसात सभा घेतली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक नेत्यांनी आपल्या सभा रद्द केल्या. पण पवारांनी 'या' वयात दाखवलेली जिद्द कौतुकास्पद होती. 

सोशल मीडियावर शरद पवारांच्या तरूणांना लाजवेल अशा या स्वभावाचं सगळीकडूनच जोरदार कौतुक झालं. अशावेळी 'चला हवा येऊ द्या' फेम लेखक अरविंद जगताप यांनी देखील आपली भावना फेसबुकवर व्यक्त केली. 'पवार कधी काय करतील याचा नेम नसतो....'असं म्हणतं अरविंद जगताप यांनी आपली भावना व्यक्त केली. विधानसभेतल्या प्रचारातला हा सर्वात प्रेरणादायी फोटो आहे असं म्हणतं त्यांनी शरद पवारांचा पावसात भिजतं सभा घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे.

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमात अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्र महाराष्ट्रभर पोहोचली. संवेदनशील लेखणीमुळे अरविंद जगताप यांनी मानाचं स्थान मिळवलं. शुक्रवारी सुरू असलेल्या पवारांच्या सभेवर जगताप यांनी लिहिलेली पोस्ट थेट हृदयाला भिडते. 

शरद पवार यांच्या 'या' जिद्दीने सगळ्यांची मन जिंकली. शरद पवार यांच्या पायाला देखील दुखापत झाली होती. पायाला झालेली जखम आणि डोक्यावरती कोसळधारा पाऊस या दोन्ही गोष्टींची तमा न बाळगता शरद पवार एक एखाद्या लढवय्या सारखे दोन हात करत होते. विपरीत परिस्थितीत ,आजूबाजूला प्रचंड नैराश्य असताना दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर लढायच कसं? हे पवारांनी सगळ्यांना दाखवून दिलं. एखाद्या तरूणाला लाजवेल अशी ऊर्जा पवारांकडे शुक्रवारी पाहायला मिळाली. 

सातारा लोकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. याठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. मात्र, शरद पवार यांनी कोणतीही पर्वा न करता मुसळधार पावसात भाषण ठोकले. या सभेसाठी हजारो लोक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवारांचा हा उत्साह पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला होता. पवारांचे हे रूप पाहून सर्वजण भारावले. कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्यांना जोरदार प्रतिसाद दिला


Find Out More:

Related Articles: