
तुम्ही पाहिला का तेजश्री प्रधानच्या ‘बबलू बॅचलर’चा ट्रेलर
छोट्या पडद्यावरील मालिका आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान आपल्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड चित्रपटासाठी सज्ज झाली असून या चित्रपटात ती अभिनेता शर्मन जोशीसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘बबलू बॅचलर’ असे असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
तेजश्रीने काही दिवसांपूर्वीच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले होते. कोणताही गाजावाजा न करता तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. पण, ट्रेलर रिलीज झाल्यानंतर एका कारणामुळे ती चर्चेत आली आहे. तेजश्रीने आपल्या पहिल्याच बॉलिवूड चित्रपटात शर्मन जोशीसोबत लिपलॉक किस दिल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या भुवया उंचावलेल्या पाहायला मिळत आहेत.
जश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या ट्रेलरची लिंक शेअर केल्यानंतर बऱ्याच नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटात तेजश्री आणि शर्मन जोशीसोबत पूजा चोप्रा आणि राजेश शर्मा यांचीदेखील मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. अजय राजवानी यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अग्निदेव चॅटर्जी यांनी केले आहे. हा चित्रपट २० मार्चला रिलीज होणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=MkZutkt2KM0&feature=emb_title