पक्षाने मला तिकीट नाकारले – एकनाथ खडसे

Thote Shubham

 भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. पण भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाचा या दोन्ही याद्यांमध्ये समावेश नाही. एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळाली नसतानाही आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पक्षाकडून अद्याप भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहीर केली नाही आणि त्यांना डावलले जात असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत असल्याने खडसे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

गुरुवारी एकनाथ खडसे यांचे शेकडो समर्थक त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि जोरदार घोषणाबाजी केली. एकनाथ खडसे यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत एक मोठे वक्तव्य केले आहे.

आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाराज कार्यकर्त्यांना एकनाथ खडसे यांनी शांत राहण्याचे आवाहन केले. आपल्याला तिकीट देणार नसल्याचे पक्षाने सांगितले आहे. कदाचित आपल्यापेक्षा चांगला उमेदवार मिळाला असावा असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. जो काही निर्णय पक्ष घेईल तो आपल्याला मान्य असेल पण सर्व कार्यकर्त्यांनी शांतता पाळावी, असेही खडसेंनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे यांनी आपल्यापेक्षा चांगला उमेदवार भाजपला मिळाला असावा असे वक्तव्य करताच खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत तुमच्यापेक्षा चांगला उमेदवार कोण? असा सवाल विचारण्यास सुरुवात केली. दरम्यान, एकनाथ खडसे यांचे समर्थक खूपच नाराज झाले.


Find Out More:

Related Articles: