‘राष्ट्रवादी’ सहकार्याची भूमिका ठेवेल; हर्षवर्धन पाटलांची अपेक्षा

Thote Shubham
रेडा – प्रत्येक लोकसभा निवडणुकीत आम्ही प्रामाणिकपणे राष्ट्रवादीला सहकार्य केले व मोठे मताधिक्‍क्‍य देऊन शब्द पाळला. त्यामुळे आता आगामी होणाऱ्या इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सहकार्याची अपेक्षा आहे, असे माजी मंत्री व कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

भारतीय जतना पक्षात पाटील प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडीबाबत चर्चा झालेली आहे. त्यामुळे अन्य पक्षांबाबत अद्याप तरी काहीच विचार नाही. गेली अनेक वर्षे आघाडीचा धर्म आम्ही पाळत आलो आहोत. यावेळी 2019च्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिलेला शब्द पाळला आहे.

इंदापूर तालुक्‍यात पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे, त्यामुळे शेती अडचणीत आली आहे. उद्योगधंदे बंद पडत चालले आहेत. तालुक्‍यात बेरोजगारीचा प्रश्‍नही वाढला आहे. इंदापूर तालुक्‍यात गेल्या पाच वर्षात रोजगार निर्मितीसाठी एकही विकासाचे काम झालेले नाही. इंदापूर तालुक्‍याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देत लवकरच इंदापूर येथे मेळावा होणार असल्याचे या दौऱ्यात हर्षवर्धन पाटील पाटील यांनी सांगितले.

यावेळी नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, भरत शहा, मंगेश पाटील, कांतीलाल झगडे, विलास वाघमोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.                                                  


Find Out More:

Related Articles: