माझा मित्र मला सोडून गेला -पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहरीनमध्ये स्थायिक असलेल्या भारतीयांना संबोधित केले. यावेळी भाषणाच्या शेवटी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. अरुण जेटली यांच्याबद्दल बोलताना मोदी भावूक झाले होते. मी कर्तव्यांनी बांधलो गेलो आहे. एका बाजूला बहरीन उत्साहाने भरलेले आहे. देश कृष्णजनमाष्टीचा उत्सव साजरा करत आहे.
पण माझ्य मनात तीव्र दु:खाची भावना आहे. विद्यार्थी दशेपासून ज्या मित्रासोबत सार्वजनिक जीवनात पावले टाकली. राजकीय जीवनात एकत्र प्रवास केला. प्रत्येक क्षणी एकमेकांसोबत होतो. स्वप्ने पाहिली, स्वप्ने पूर्ण केली. असा एक मोठा प्रवास ज्या मित्रासोबत केला. ते माझे मित्र अरुण जेटली यांचे आज निधन झाले.
मी कल्पना करु शकत नाही. मी इतका लांब आहे आणि माझा मित्र मला सोडून गेला. या ऑगस्ट महिन्यात काही दिवसांपूर्वी माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, आज माझा मित्र अरुण मला सोडून गेला. माझ्या मनात दुविधा आहे. एका बाजूला कर्तव्य आहे. दुसऱ्या बाजूला मैत्रीच्या आठवणी आहेत. मी आज बहरीनमधून अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहतो त्यांना नमन करतो. या दु:खद प्रसंगात ईश्वर त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो ही प्रार्थना करतो असे मोदी म्हणाले.