भाजपमध्ये होणार मोठे फेरबदल

     भारतीय जनतापक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी येत्या 13 आणि 14 जून रोजी दिल्लीत पक्ष मुख्यालयात पक्षाची एक महत्वाची बैठक आयोजित केली असून या बैठकीत भाजप पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्याबाबत निर्णय घेतले जाणार आहेत असे सांगण्यात येते. पक्षात एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार मंत्रीपदी विराजमान झालेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या ऐवजी दुसरे पदाधिकारी नेमण्यात येणार आहेत.


     तसेच पक्षाच्या अंतर्गत निवडणुकांचा कार्यक्रमही यावेळी निश्‍चीत केला जाणार आहे. मुळात स्वता अमित शहा हे केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्याने त्यांच्या जागीही नवीन अध्यक्ष नेमला जाणार आहे. त्याविषयीचा निर्णयही याच बैठकीत होईल अशी अपेक्षा आहे. अमित शहा यांच्या जागी जे. पी. नड्डा यांच्या नावाला सर्वाधिक पंसती असल्याचे सांगितले जात आहे. देशातील सर्वप्रदेशांच्या पक्षांतर्गत निवडणुकांचा कार्यक्रम यावेळी निश्‍चीत केला जाईल. तथापी झारखंड, महाराष्ट्र, हरियाना या सारख्या राज्यांमध्ये लवकरच निवडणुका होत असल्याने त्या राज्यांच्या पक्षांतर्गत निवडणूका मात्र लांबणीवर टाकल्या जाण्याची शक्‍यता आहे.

Find Out More:

Related Articles: