कोरोनाग्रस्तांसाठी विकी कौशल ची 1 कोटींची मदत

Thote Shubham
मुंबई : ‘कोरोना’विरुद्ध लढाईसाठी अनेक मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपापल्या परिने करोनाग्रस्तांना मदत करताना दिसत आहेत. अभिनेता अक्षय कुमारने २५ कोटींची मदत केली.

तसेच अभिनेता विकी कौशलने देखील करोना व्हायरसशी लढणाऱ्या रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केले आहे. विकीने PM Cares फंड आणि महाराष्ट्र चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये एक कोटी रुपयांची रक्कम मदत म्हणून दिली आहे.

विकीने अशी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. ‘आज मी माझ्या कुटुंबीयांसोबत घरात बसलो आहे आणि हे मी माझे भाग्यच समजेल. पण काही लोक असे आहेत जे घरी राहू शकत नाही.

या कठिण काळासाठी मी PM Cares फंड आणि महाराष्ट्र चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये एक कोटी रुपयांची रक्कम मदत म्हणून देत आहे. आज आपण एकमेकांसोबत आहोत आणि मला खात्री आहे आपण एकत्र यातून बाहेर पडू,’ असं पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे.

दरम्यान, बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने विदेशात राहूनही PM Cares फंडमध्ये काही रक्कम मदत म्हणून दिली आहे. तसेच इतरांनी देखील जमेल तशी मदत करावी असे आवाहन चाहत्यांना केले आहे.

Find Out More:

Related Articles: