टीक-टॉकने भारतात लाँच केले नवीन अॅप
शॉर्ट व्हिडीओ अॅप टीक-टॉक भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अॅप पैकी एक आहे. टीक-टॉकची मूळ कंपनी बाइटडान्सने आता भारतात एक नवीन म्यूझिक अॅप रेस्सो (Resso) लाँच केले आहे. बाइटडान्सचे हे नवीन अॅप जिओ म्यूझिक, गाना, स्पॉटिफायला टक्कर देईल.
रेस्सो अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्ही गाणी ऐकण्यासोबतच स्वतःच कॅरोअकेसह गाणे गाऊ शकता. गाण्यासाठी तुम्हाला अनेक म्यूझिक ट्रॅक आणि लिरिक्स मिळतील. या अॅपवर युजर्स कंटेंट शेअर देखील करू शकतात व कमेंट देखील करू शकता. गाण्याचे शब्द स्क्रीनवर दिसतील. जेणेकरून युजर्स गाणे गाऊ शकतील.
आतापर्यंत कोणत्याच अॅपमध्ये लिरिक्सचे (गीत) फीचर नव्हते. रेस्सोला या फीचरचा फायदा होऊ शकतो. या मध्ये अनेक मोड्स देखील देण्यात आलेले आहेत. सोबतच या अॅपवर करण्यात आलेली कमेंट सार्वजनिक असेल व कोणीही पाहू शकेल.
हे अॅप फ्री असले तरी काही फीचर्ससाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. अँड्राईड युजर्ससाठी मासिक सर्व्हिस 99 रुपये आणि आयफोन युजर्ससाठी 199 रुपये आहे. पेड सर्व्हिस घेतल्यास युजर्सला गाणी डाउनलोड करणे आणि हाय क्वॉलिटी व्हिडीओ सारखे फीचर्स मिळतील.