जे कमावलं, ते भारतीयांमुळेच, अभिनेता कार्तिक आर्यनकडून 'पीएम फंडाला' एक कोटी

Thote Shubham
मुंबई : ‘कोरोना’ भारतात हातपाय पसरु लागत असतानाच सर्व स्तरातून मदतीचा ओघही मिळताना दिसत आहे. ‘आतापर्यंत मी जे कमावलं, ते भारतीय नागरिकांमुळेच’ असं म्हणत नव्या दमाचा बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने एक कोटी रुपयांची मदत ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’ला केली आहे. 

‘राष्ट्र म्हणून एकत्र उभं राहण्याची गरज आहे. मी जो कोणी आहे, जो पैसा मी आतापर्यंत कमावला आहे, तो फक्त भारतातील जनतेमुळे. आपल्यासाठी मी ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’ला एक कोटी रुपयांचे योगदान देत आहे.

मी सर्व भारतीयांना आवाहन करतो, त्यांनी आपल्या परीने शक्य तितकी मदत करावी’ असं कार्तिकने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले आहे. ‘पूर्वीपेक्षा आता एकमेकांची जास्त गरज आहे. चला आपला पाठिंबा दर्शवू’ असंही त्याने पुढे लिहिलं आहे.


मोदींनी जाहीर केलेल्या ‘जनता कर्फ्यू’नंतर कार्तिक आर्यनने नागिरकांना घरात बसण्याचे आवाहन केले होते. ‘प्यार का पंचनामा’ सिनेमात कार्तिक आर्यनचा डायलॉग गाजला होता. त्याच स्टाईलमध्ये कार्तिकने मोदींच्या आवाहनाला जोरदार पाठिंबा दर्शवला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता.

Find Out More:

Related Articles: