कोरोना : चित्रपट, टीव्ही मालिकांचे चित्रीकरण बंद

Thote Shubham

चित्रपट आणि टीव्ही उद्योग क्षेत्राला कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसाराचा फटका बसला असून त्या पार्श्वभूमीवर इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशनने चित्रपट, टीव्ही आणि वेबसिरीजचे चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व प्रकारचे चित्रीकरण १९ मार्च ते ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत.

 

भारतात आणि परदेशात सध्या अनेक चित्रपटांचे शूटींग सुरू आहे. इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशनने निर्णय घेतल्यानंतर शूटींग सर्वांना पॅकअप करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

 

जगभरात कोरोना व्हायरसची दहशत आहे. आम्ही फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्यांची एक बैठक घेतली. दीर्घ चर्चेनंतर १९ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत शूटींग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे इंडियन फिल्म टीवी डायरेक्टर असोसिएशनचे चेअरमन यांनी सांगितले आहे.                                                                                                                                                                                 

 

Find Out More:

Related Articles: