पवारांवर गुन्हा दाखल करण्याच्या कृतीचे राज्यभर तीव्र पडसाद, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर मुंबईत लाठीमार

Thote Shubham

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक म्हणजेच शिखर बॅंकेत केलेल्या घोटाळ्याच्या कथीत सहभागावरून शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्याचे राज्यभर पडसाद उमटले. मुंबईत ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. तर काही जणअंना ताब्यात घेतले.

पुणे, बारामत, मराठवाडा आणि राज्याच्या अन्य भागात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी “ईडी की दादागिरी नही चलेगी’, सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है’ अशी घोषणाबाजी केली.

मुंबईत ईडी कार्यालयापुढे सकाळी कार्यकर्ते जमा झाले. त्यामनी प्रचंड घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. त्यामुळे वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला. त्यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत आंदोलकांना पांगवले. सरकार दडपशाही करून विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पवार यांना तरूण वर्गाकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे सरकार भांबावले असून ते दडपशाही करत असल्याचा अरोप केला आहे.

पुण्यात महात्मा फुले मंडई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. मात्र, रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. महात्मा फुले मंडई पोलिस चौकीत नेण्यात आले असता पोलीस चौकीतील गॅलरीमधून आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे मंडई परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

कारवाईच्या निषेधार्थ आज बारामती शहरात बंद पाळला आहे. विविध सामाजिक संघटनांनी बारामती बंदचे आवाहन केले आहे. पवारांवर गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यानंतर कालच बारामतीकरांनी बंदची हाक दिली होती. जिल्ह्यातही ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्याच वृत्त असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

औरंगाबादेत कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. त्याची चर्चा आज परिसरात होती. अहमदनगरमध्ये कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून शरद पवार यांच्या वरील खोटे गुन्हे ताबडतोब मागे घ्यावेत अशी मागणी करणारे निवेदन सरकारी अधिकाऱ्यांना दिले.

नवी मुंबईत झालेल्या  माथाडी कामगारांच्या मेळाव्यात या घटनेचे पडसाद उमटले. आमदार शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या समोरच या विषयाला हात घातला. ८० वर्षांसाफ्या ज्येष्ठ नेत्याला असा त्रास देणे बरोबर नाही. याविरोधात माथाडी कामगार बघ्याची भूमिका घेणार नाही. स्व. बाळासाहेब आणि पवार साहेब यांच्या मैत्रीची तरी जाण ठेवा असे त्यांनी खडसावले.


Find Out More:

Related Articles: