
आला ‘अंग्रेजी मीडियम’चा धमाकेदार ट्रेलर
गेली अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेला अभिनेता इरफान खानच्या अंग्रेजी मीडियम या चित्रपटाचा ट्रेलर अखेर लाँच झाला आहे. 2017 सालीआलेल्या ‘हिंदी मीडियम’च्या चित्रपटाचीच एक वेगळी बाजू या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
ट्रेलरमध्ये वडील व मुलीमधील एक भावनिक नाते दाखवण्यात आले आहे. इरफान खान या चित्रपटात उदयपूरच्या चंपक नावाच्या मिठाई वाल्याची भूमिका साकारत आहे. तर त्याच्या मुलीच्या भूमिकेत राधिक मदन आहे. तर करिना पोलिसाच्या भूमिकेत आहे. मुलीला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे असून, त्यासाठी पैसे जमवण्याचा संघर्ष, वडील-मुलीमधील नाते या चित्रपटात पाहायला मिळेल.
इरफान खानसोबतच या चित्रपटात राधिका मदन, करिना कपूर, दीपक डोब्रीयाल, डिंपल कपाडिया, रणवीर शौरी, पंकज त्रिपाठी आणि किकू शारदा यांची प्रमुख भुमिका असेल. चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदाजानियाने केले असून, 20 मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.