मराठी चित्रपट सुष्टीतील ‘या’ अभिनेत्रीला अटक

Thote Shubham

मराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री सारा श्रवणाला हिला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. साराने ‘रोल नंबर १८’ या चित्रपटातील अभिनेत्याविरोधात कटकारस्थान करुन विनयभंगाची खोटी तक्रार दाखल केली होती. तसंच ही तक्रार मागे घेण्यासाठी तिने अभिनेत्याला धमकी देत त्याच्याकडून खंडणी उकळली.


अटक केल्यानंतर पोलिसांनी सारा शिवाजी नगर न्यायालयामध्ये हजर केले. न्यायालयानं तिची १५ हजारांच्या जामीनावर सुटका केल्याचं वृत्त आहे. अटकपूर्व जामीन अर्जाला फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद पवार आणि अ‍ॅड. अजय ताकवणे यांनी विरोध केला होता.

 

साराने धमकी दिलेल्या अभिनेत्याचं नाव सुभाष दत्तात्रय यादव असं असून, त्यानं दिलेल्या फिर्यादीवरुन सहकारनगर पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली.

 

तसंच याप्रकरणी तिला मदत करणाऱ्या ‘रोल नंबर १८’ मधील अभिनेत्री रोहिणी मच्छिंद्र माने, दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल विष्णू टेकाळे आणि राम भरत जगदाळे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यांना अटक झाल्यानंतर साराने दुबईला पळ काढला होता. मात्र ती मुंबईमध्ये येताच तिला पोलिसांनी अटक केली.

Find Out More:

Related Articles: