अभिनेता संजय दत्तचा ‘पानिपत’ चित्रपटातील फर्स्ट लुक रिलीज

frame अभिनेता संजय दत्तचा ‘पानिपत’ चित्रपटातील फर्स्ट लुक रिलीज

Thote Shubham
गेल्या काही दिवसांपासून ‘पानिपत’ चित्रपटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. दिग्दर्शक – निर्माता आशुतोष गोवारीकर यांच्या महत्त्वाकांक्षी पानिपत चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले होते.

‘पानिपत’ सिनेमा जोधा अकबर, मोहेंजेदारो, या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर लवकरच पानिपत चित्रपट घेऊन येत आहे. पानिपत हा चित्रपट येत्या ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

अभिनेता संजय दत्त यांनी अहमद शाह अब्दाली यांची व्यक्तिरेखा साकारली असून अभिनेत्री क्रीती सिनॉन हिचा देखील चित्रपटातील फर्स्ट लुक सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे.

तसेच या चित्रपटाची कथा पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित आहे. हे युद्ध १४ जानेवारी १७६१ साली मराठा आणि अफगाणिस्तानच्या सुलतान अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झाले होते.                                                                                                                                                             



Find Out More:

Related Articles:

Unable to Load More