भारताची पहिली डे-नाइट कसाेटी भारतामध्ये पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघाची नीचांकी धावसंख्या

Thote Shubham

काेलकात्याच्या एेतिहासिक ईडन गार्डन मैदानावरच्या पहिल्या डे-नाइट कसाेटी सामन्यामध्ये गुलाबी चेंडू हा वेगवान गाेलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरणार असल्याचे भाकीत दाेन दिवसांपूर्वीच वर्तवण्यात अाले हाेते. यातील सत्यता अाता भारताच्या वेगवान गाेलंदाजांनी बांगलादेश संघाविरुद्ध गुलाबी चेंडूवरच्या पहिल्या कसाेटीच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट केली.

पहिल्याच दिवशी सर्वच १० विकेट वेगवान गाेलंदाजांनी घेण्याचा पराक्रम गाजवला अाहे. यामध्ये भारताचा ईशांत शर्मा (५), उमेश यादव (३) अाणि माे. शमी (२) हे तिघे सहभागी अाहेत. या तिघांच्या भेदक माऱ्यामुळे बांगलादेश संघाचा पहिल्या डावात अवघ्या १०६ धावांवर खुर्दा उडाला. टीमच्या शदमानने एकाकी झंुज देताना सर्वाधिक २९ धावांची कमाई केली. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ३ बाद १७४ धावा काढल्या. पुजाराने (५५) अर्धशतक साजरे केले. अाता काेहली (५९) व रहाणे (२३) मैदानावर खेळत अाहे. मयंक (१४) व राेहित (२१) झटपट बाद झाले.

कसाेटीत 5 कन्कशन सामन्यात बांगलादेशच्या २ खेळाडूंना कन्कशन (डाेक्याला चेंडू लागला) झाले. लिटन दासच्या जागी मेहदी हसन अाणि नईम हसनच्या जागी ताईजुलला मैदानावर खेळण्यास संधी.

अातापर्यंत कन्कशन सब्स्टिट्यूट - स्मिथच्या जागी लबुचाने, लॉर्ड्स - डॅरेन ब्रावोच्या जागी ब्लॅकवुड, किंग्स्टन - डीन एल्गरच्या जागी थेनिस डी ब्रुएन, रांची - लिटनच्या जागी मेंहदी हसन, कोलकाता - नईमच्या जागी ताईजुल, कोलकाता

100 बळी (यष्टीमागे) वृद्धिमान साहाचे यष्टिरक्षकाच्या भूमिकेत कसाेटीत पूर्ण झाले. ३५ डावांत हे शतक साजरे करत त्याने धाेनीशी बराेबरी साधली. 6 वा कर्णधार मोमिनुल हक डे-नाइट कसाेटीत शून्यावर बाद हाेणारा. श्रीलंकेचा चांदिमल दाेन वेळा असा बाद

वेगवेगळ्या चेंडूंवर गाेलंदाजाचे पाच बळी लाल चेंडू- निसार वि. इंग्लंड, लाॅर्ड‌्सवर (1932) पांढरा चेंडू- रवी शास्त्री वि. ऑस्ट्रेलिया, पर्थमध्ये (1991) गुलाबी चेंडू- ईशांत वि. बांगलादेश, अाता (2019)

भारतीय लिजेंड्सचे #throwback2001 जेवणाच्या ब्रेकदरम्यान भारताच्या दिग्गज सचिन, लक्ष्मण अाणि हरभजनसिंगने अाॅस्ट्रेलिया संघाविरुद्ध २००१ मध्ये ईडन गार्डनवर झालेल्या कसाेटी सामन्याच्या अाठवणींना उजाळा दिला. या सामन्यात लक्ष्मण अाणि द्रविडने संयमी खेळी करताना ३७६ धावांची भागीदारी रचली हाेती. हरभजनने हॅट‌्ट्रिकसह १३ विकेट घेतल्या हाेत्या. गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने १७१ धावांनी अाॅस्ट्रेलियावर मात केली हाेती.

घरच्या मैदानावर चाैथ्यांदा १० बळी वेगवान गाेलंदाजांचे प्रतिस्पर्धी - मैदान - वर्ष इंग्लंड - मुंबई - 1981 वेस्ट इंडीज - अहमदाबाद - 1983 श्रीलंका - कोलकाता - 2017 बांगलादेश - कोलकाता - 2019

३१ वर्षीय ईशांतने करिअरमध्ये १० व्यांदा डावात ५ बळी घेतले. त्याच्या ९६ कसाेटीत २८८ विकेट नाेंद. ईशांंतने घरच्या मैदानावर २००७ मध्ये ५ बळी घेतले. तेव्हा त्याचे वय १९ हाेते. दुसरी कसाेटी हाेती.

धावफलक नाणेफेक बांगलादेश (फलंदाजी) बांगलादेश (पहिला डाव) धावा चेंडू ४ ६ शदमान झे.साहा गाे. उमेश २९ ५२ ०५ ० कायेस पायचीत गाे. इशांत ०४ १५ ०० ० माेमिनुल झे. राेहित गाे. उमेश ०० ०७ ०० ० मिथून त्रि.गाे. उमेश ०० ०२ ०० ० मुशफिकूर रहिम त्रि.गाे.शमी ०० ०४ ०० ० महमुद्दुल्लाह झे. साहा गाे. इशांत ०६ २१ ०१ ० लिटन दास रिटायर्ड हर्ट २४ २७ ०५ ० नईम हसन झे. पुजारा गाे. इशांत १९ २८ ०४ ० इदाबत हुसैन त्रि.गाे. इशांत ०१ ०७ ०० ० मेंहदी हसन झे. पुजारा गाे. इशांत ०८ १३ ०२ ० अल अमिन हुसैन नाबाद ०१ ०४ ०० ० अबु जायेद झे.पुजारा गाे. शमी ०० ०३ ०० ० अवांतर : १४. एकूण : ३०.३ षटकांत सर्वबाद १०६ धावा. गडी बाद हाेण्याचा क्रम : १-१५, २-१७, ३-१७, ४-२६, ५-३८, ६-६०, ७-८२, ८-९८, ९-१०५, १०-१०६. गाेलंदाजी : इशांत शर्मा १२-४-२२-५, उमेश यादव ७-२-२९-३, माे. शमी १०.३-२-३६-२, रवींद्र जडेजा १-०-५-०. भारत (पहिला डाव) धावा चेंडू ४ ६ मयंक झे. मेंहदी गाे. अमिन १४ २१ ०३ ० राेहित पायचीत गाे. इदाबत २१ ३५ ०२ १ पुजारा झे. शदमान गाे. इदाबत ५५ १०५ ०८ १ विराट काेहली नाबाद ५९ ९३ ०८ ० अजिंक्य रहाणे नाबाद २३ २२ ०३ ० अवांतर : ०२. एकूण : ४६ षटकांत ३ बाद १७४ धावा. गडी बाद हाेण्याचा क्रम : १-२६, २-४३, ३-१३७. गाेलंदाजी : अल अमिन हुसेन १४-३-४९-१, अबु जायेद १२-३-४०-१, इदाबत हुसैन १२-१-६१-२, तैजुऊल ८-०-२३-०.

Find Out More:

Related Articles: