चौथ्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ; स्मिथचे झाले पुनरागमन

Thote Shubham

उद्यापासून(4 सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथ्या ऍशेस कसोटीला ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आज(3 सप्टेंबर) 12 जणांचा संघ घोषित केला आहे.

या 12 जणांच्या संघात स्टिव्ह स्मिथने पुनरागमन झाले आहे. त्याला दुसऱ्या ऍशेस कसोटीत जोफ्रा आर्चरचा चेंडू मानेच्या जवळ लागला होता. त्यामुळे या सामन्याच्या आर्ध्यातूनच त्याला बाहेर पडावे लागले होते. तसेच त्याला तिसऱ्या ऍशेस कसोटीलाही मुकावे लागले होते.

पण त्याची चौथ्या ऍशेस कसोटीसाठी संघात निवड करण्यात आली आहे. तसेच त्याच्या ऐवजी मागील 3 डाव ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी केलेल्या मार्नस लॅब्यूशानेलाही चौथ्या कसोटीसाठी 12 जणांच्या ऑस्ट्रेलिया संघात संधी मिळाली आहे. लॅब्यूशानेने मागील तिन्ही डावात अर्धशतके केले आहे.

पण स्मिथच्या पुनरागमनामुळे उस्मान ख्वाजाला चौथ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे.

त्याचबरोबर तिसऱ्या कसोटीत कॅमरॉन बॅनक्रॉफ्ट ऐवजी सलामीली संधी मिळालेल्या मार्कस हॅरिसला चौथ्या कसोटीसाठीही 12 जणांच्या संघात कायम करण्यात आले आहे.

तसेच गोलंदाजांमध्ये पॅट कमिन्स, पीटर सिडल, मिशेल स्टार्क, नॅथन लायन आणि जॉस हेजलवूड यांना चौथ्या कसोटीसाठी 12 जणांच्या संघात संधी मिळाली आहे.

स्टार्क अजून या ऍशेस मालिकेत एकही सामना खेळलेला नाही. पण त्याने या सामन्याआधी डर्बीशायर विरुद्ध पार पडलेल्या सराव सामन्यात 7 विकेट्स घेत लयीत असल्याचे तसेच फिट असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे त्याचा चौथ्या ऍशेस कसोटीसाठी अंतिम 11 जणांमध्ये समावेश होईल अशी शक्यता आहे. अंतिम 11 जणांचा संघ नाणेफकी वेळी समजणार आहे.

चौथ्या ऍशेस कसोटीसाठी असा आहे 12 जणांचा ऑस्ट्रेलिया संघ – 

डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लॅब्यूशाने, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू वेड, टिम पेन (कर्णधार/यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, पीटर सिडल, मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेजलवुड.


Find Out More:

Related Articles: