आयफोन ऑनलाईन खरेदीवर निर्बंध

Thote Shubham

करोना प्रभावामुळे आयफोनचे उत्पादन थंडावले असल्याने बाजारात पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी अॅपलने आयफोनच्या ऑनलाईन खरेदीवर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार ग्राहक एकच मॉडेलचे दोन आयफोन एकाचवेळी खरेदी करू शकणार नाही. दोन वेगळ्या मॉडेलचे फोन मात्र त्याला खरेदी करता येतील असे समजते. अमेरीका, चीन समवेत अनेक देशात हे निर्बंध शुक्रवार पासून लागू केले गेले आहेत.

 

आयफोन २००७ मध्ये प्रथम बाजारात आले तेव्हापासून प्रथमच त्याच्या खरेदीवर निर्बंध घातले गेले आहेत. यामागे कंपनीचा फोनचे रीसेलिंग थांबविण्याचा प्रयत्न आहे. अनेक देशात अॅपल वेबसाईटवर ड्रॉप डाऊन लिमिट सर्व मॉडेल्स साठी लागू केले गेले आहे. चीन मध्ये करोना मुळे बंद केली गेलेली अॅपलची सर्व स्टोर्स १३ मार्च पासून सुरु झाली असली तरी चीनमधील अॅपलची सर्वात महत्वपूर्ण उत्पादक सहकारी फॉक्सकॉन मधील उत्पादन अजूनही पूर्ण क्षमतेने सुरु झालेले नाही.


अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी अॅपलच्या सर्व भागभांडवलदारांना नुकतेच एक पत्र लिहून या कॅलेंडर वर्षात कंपनी ठरविलेले महसूल लक्ष्य कदाचित गाठू शकणार नाही असे कळविले आहे. चीन मधील आयफोन उत्पादन सुरु असले तरी जगाच्या बाकी भागातील अॅपल स्टोर्स अजून बंड आहेत त्यामुळे आयफोनची मागणी घटली आहे.

Find Out More:

Related Articles: