रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्यानुसार, भारत लवकरच प्रमुख डिजाटल सोसायटी असणारा देश बनणार आहेत. पुढील 24 महिन्यात आर्टिफिशियल इंटेलिजेंस, इंटरनेट ऑफ थिंग्स, ब्लॉकचेन, क्लाउड कंप्यूटिंग आणि चौथी औद्योगिक क्रांतीचे तंत्रज्ञानाद्वारे भारताचा प्रमुख देशांमध्ये समावेश होईल. पंडित दीनदयाळ पेट्रोलियम युनिवर्सिटीच्या दीक्षांत समारोहात अंबानी बोलत होते. या समारोहात गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते.
मुकेश अंबानी म्हणाले की, 24 महिन्यांपेक्षा अधिक कमी वेळेत आपण 155 वरून पहिल्या स्थानावर पोहचलो. मी विश्वासाने म्हणू शकतो की, भारत हा असा देश आहे की, जो डिजिटायझेशनच्या क्षेत्रात प्रत्येक दिवशी, प्रत्येक तासाला काहीतरी नवीन करत आहे.
मुकेश अंबानी यांच्यानुसार, देशातील शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस सारखे तंत्रज्ञान वापरले जाईल. याद्वारे छोट्या उद्योगधंद्यांना फायदा होईल. शहरं आणि गावांना स्मार्ट बनवले जाईल.
अंबानी यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींचे 2024 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचवण्याचे स्वप्न नक्की पुर्ण होईल. भारताचे भविष्य उज्जवल आहे. योग्य भोजन, शिक्षण, आरोग्य, जीवन आणि गाव-शहरांमध्ये उत्तम सुविधा हे सर्व चित्र डोळ्यासमोर येते.