
गुगलचे हे खास फीचर तुमची खाजगी माहिती ठेवेल सुरक्षित
जर तुम्ही देखील तुमच्या ईमेलमध्ये बँकेसंबंधी खाजगी माहिती, टॅक्स रिटर्न, मित्र-कुटुंबातील सदस्यांचे ईमेल ठेवत असाल तर ही माहिती लीक व्हावी असे तुम्हाला वाटणार नाही. गुगलचे डॅशबोर्ड असेच एक फीचर आहे, ज्याद्वारे तुम्ही जी-मेल अकाउंटवर कायम लक्ष ठेऊ शकता. हा डॅशबोर्ड तुम्हाला दर महिन्याला लॉग-इन संबंधी माहितीचा रिपोर्ट देईल. या खास फीचरविषयी जाणून घ्या.

गुगल डॅशबोर्डचा वापर करण्यासाठी तुम्हाला जी-मेल अकाउंट लॉग-इन करावे लागेल. यानंतर प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करून माय अकाउंट पर्यायाला निवडा. तुम्हाला तुमचे गुगल अकाउंट पेज दिसेल. येथे ‘पर्सनल इंफो अँड प्रायव्हेसी’मध्ये जाऊन ‘अकाउंट ओव्हरव्यू’ हा पर्याय निवडा.
यानंतर तुम्हाला व्ह्यू डॅशबोर्डचा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्ही तुमचे काम करू शकाल. तुम्ही वापरलेल्या गुगल अकाउंट, गुगल न्यूज, गुगल ड्राईव्ह, गुगल प्लस, गुगल प्ले आणि मॅप्स सारख्या सर्व सेवांची माहिती येथे मिळेल.

या डॅशबोर्डद्वारे तुम्ही नेहमी जी-मेल अकाउंटवर लक्ष ठेऊ शकता. येथे तुम्ही ‘सेंड मी मंथली रिमाइंडर टू चेक माय अकाउंट एक्टिविटी’ बॉक्सवर क्लिक करू शकता. यानंतर गुगल दर महिन्याला तुम्हाला रिपोर्ट पाठवेल.
