
अॅपलचा सर्वात स्वस्त मॅकबुक, सर्वाधिक पॉवरफुल आयपॅड भारतात लाँच
टेक कंपनी अॅपलने आपला सर्वात स्वस्त मॅकबुक भारतात लाँच केला आहे. कंपनीने नवीन मॅजिक कीबोर्डसोबत नवीन मॅकबुक एअर व्हेरिएंट लाँच केले आहे. कंपनीनुसार, नवीन मॅकबुकमध्ये उत्तम सीपीयू परफॉर्मेंस आणि 80 टक्के अधिक वेगवान ग्राफिक्स देण्यात आले आहे. मॅकबुकच्या नवीन व्हेरिएंटची सुरूवाती किंमत 92,990 रुपये असून, लवकरच भारतात याची विक्री सुरू होईल.
मॅकबुक एअरच्या नवीन व्हेरिएंटमध्ये 256जीबी स्टोरेज देण्यात आलेले आहे. जे सध्याच्या रेंजच्या तुलनेत दुप्पट आहे. मॅकबुक एअरमध्ये 13 इंच रेटिना डिस्प्ले, टच आयडी आणि मोठा टचपॅड देण्यात आलेला आहे. अॅपलने पहिल्यांदाच मॅकबुकमध्ये क्वॉडकोर प्रोसेसरचा वापर केला असून, कंपनीने यात 1.2GHz क्वाड-कोर कोर i7 प्रोसेसर दिले आहे. यात तीन माइक, तीन थंडरबोल्ट पोर्ट, 6के डिस्प्ले सपोर्ट, वाइड स्टीरियो साउंड सपोर्ट मिळेल.

पॉवरफुल आयपॅड देखील लाँच –
अॅपलने मॅकबुक एअरसोबतच आपला सर्वाधिक पॉवरफुल आयपॅड देखील भारतात लाँच केला आहे. कंपनीचा दावा आहे की, आयपॅड प्रो अधिकांश विंडोज पीसी लॅपटॉपपेक्षा वेगवान आहे. नवीन आयपॅड प्रो 11 आणि 12.9 इंच डिस्प्लेसोबत येतो. या आयपॅडमध्ये A12Z बायॉनिक चिप देण्यात आलेली आहे. यात अल्ट्रा वाइड कॅमेऱ्यासह LiDAR स्कॅनर देण्यात आलेले आहे.
दोन्ही आयपॅड प्रो सिल्वर आणि स्पेस ग्रे रंगात उपलब्ध आहेत. 11 इंच आयपॅड प्रोच्या वाय-फाय मॉडेल व्हेरिएंटची किंमत 71,900 रुपये आणि वाय-फाय+ सेल्युलर मॉडेलची किंमत 85,900 रुपये आहे. 12.9 इंच मॉडेलची सुरूवाती किंमत 89,900 रुपये आणि वाय-फाय+ सेल्युलर मॉडेलची किंमत 1,03,900 रुपये आहे.

आयपॅड प्रोमध्ये 8 कोर जीपीयूसोबत A12Z बायॉनिक चिपसेट देण्यात आले आहे. जे या आयपॅडला अॅपलचा सर्वाधिक पॉवरफुल आयपॅड बनवते. कंपनीचे म्हणणे आहे की, सिंगल चार्जमध्ये नवीन आयपॅड 10 तास बॅकअप देईल. सोबतच यात 12 मेगापिक्सल वाइड कॅमेरा आणि 10 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आलेला आहे.