आता गूगल प्ले स्टोअरमध्ये देखील वापरता येणार ‘डार्क मोड’

Thote Shubham

अँड्राईड 10 ओएसमधील सर्वात खास फीचर डार्क मोड असून, काही दिवसांपुर्वीच व्हॉट्सअ‍ॅपसाठी देखील डार्क मोड फीचर रोल आउट करण्यात आलेले आहे. याआधी गुगल ट्रांसलेट आणि ट्विटरसाठी देखील हे फीचर जारी करण्यात आले होते. आता अखेर गुगल प्ले स्टोरसाठी देखील हे फीचर जारी करण्यात आले आहे.

 

गुगल प्ले स्टोरसाठी डार्क फीचरला सर्व अँड्राईड फोनसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे. हे फीचर प्ले स्टोरच्या बॅकग्राउंडला काळ्या रंगात बदलेल. युजर्सला आपल्या गरजेनुसार हे फीचर्स सुरू करू शकतात. हे फीचर इनेबल करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोरमध्ये जाऊन डाव्या बाजूला देण्यात आलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल.

 

येथे सेटिंग्समध्ये थीम पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाइट, डार्क आणि सिस्टम डिफॉल्ट हे तीन पर्याय दिसतील. यातील डार्क पर्याय निवडल्यावर प्ले स्टोरचे बॅकग्राउंड काळे होईल. हे फीचर सुरू केल्यानंतर अंधारात अथवा कमी प्रकाशात फोनचा वापर करणे आरामदायी होते. यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही.

 

https://twitter.com/GooglePlay/status/1237755190704590850?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1237755190704590850&ref_url=https%3A%2F%2Fwww.majhapaper.com%2F2020%2F03%2F13%2Fgoogle-play-store-dark-theme-now-available%2F

Find Out More:

Related Articles: