अँड्राईडमध्ये आढळलेल्या या त्रुटीमुळे खराब होऊ शकतो तुमचा स्मार्टफोन

Thote Shubham

अँड्राईड स्मार्टफोन संबंधित अनेक त्रुटी गेली अनेक दिवसांपासून समोर येत आहे. आता अशा त्रुटी समोर आली आहे, ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन पुर्णपणे खराब होऊ शकतो. अँड्राईड सिक्युरिटी बुलेटिनमध्ये तीन त्रुटींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यातील एका त्रुटीला गुगलकडून सर्वात धोकादायक सांगण्यात आले आहे.

 

गुगलने स्पष्ट केले की, समोर आलेल्या त्रुटीद्वारे हॅकर्स सिंगल मलेशियस मेसेज तयार करू शकतात व त्यातून ‘Denial of Service’ हल्ला करू शकतात. या त्रुटीला ‘CVE-2019-2232’ असे नाव देण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे ही त्रुटी युजर्सच्या परवानगी शिवाय एक्टिवेट होते व यामुळे स्मार्टफोनला नुकसान पोहचते.

 

गुगलनुसार, य त्रुटीचा परिणाम जे स्मार्टफोन्स Android 8.0, Android 8.1, Android 9 आणि Android 10 यावर काम करतात, त्यांच्यावर होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात युजर्सवर परिणाम होवू शकतो व हॅकर्सकडून निशाणा बनवले जावू शकते.

 

अँड्राईडकडून याचे फिक्स अँड्राईड ओपन सोर्स प्रोजेक्टला देण्यात आले आहे. युजर्सच्या स्मार्टफोनपर्यंत हे फिक्स येण्यासाठी वेळ लागेल. लेटेस्ट सिक्युरिटी पॅच युजर्सला मिळण्यास अजून वेळ लागेल. सर्वात प्रथम गुगल पिक्सेल डिव्हाईसला हे सिक्युरिटी अपडेट मिळतील.

Find Out More:

Related Articles: