व्हॉट्सअॅपचे कॉल वेटिंग फीचर लाँच
आता आणखी एका नव्या फीचरची व्हॉट्सअॅपमध्ये एण्ट्री झाली असून व्हॉट्सअॅप कॉलदरम्यान आता युजर्सला कॉल वेटिंगचे नोटिफिकेशन मिळणार आहे. आता हे फीचर आल्यामुळे युजर्सचे कॉल मिस होणार नाहीत. युजर्सला आतापर्यंत व्हॉट्सअॅप कॉलदरम्यान येणाऱ्या दुसऱ्या कॉलचे नोटिफिकेशन मिळत नव्हते. पण हे नवे फीचर आता व्हॉट्सअॅपने लाँच केल्यामुळे कॉलिंगदरम्यान दुसरा कॉल रिसिव्ह किंवा तुम्ही कट करु शकता.
सुरुवातीला iOS साठी व्हॉट्सअॅपचे कॉल वेटिंग फीचर रोलआऊट करण्यात आले होते. हे फीचर आता अँड्रॉईडसाठी सुरु करण्यात आले आहे. टेलिकॉम सर्व्हिसच्या कॉल वेटिंग फीचरसारखे हे फीचर काम करते. युजर्सला हे नवीन फीचर मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन लेटेस्ट व्हर्जन 2.19.357 अपडेट करावे लागणार आहे.
व्हॉट्सअॅप युजर्ससाठी कॉल वेटिंग फीचरशिवाय नवीन प्रायव्हेसी सेटिंगही रोलआऊट करण्यात आली आहे. आता नवीन प्रायव्हेसी सेटिंग मिळाल्यानंतर युजर्स ठरवू शकतो की, कुणाला ग्रुपमध्ये अॅड करु शकता आणि कुणाला नाही. काही निवडक युजर्ससाठी हे सुरुवातीला रोलआऊट करुन पाहिले होते. पण हे सर्व युजर्ससाठी आता उपलब्ध केले आहे.
त्याचबरोबर आता युजर्स आपले व्हॉट्सअॅप चाट फोनच्या फिंगर प्रिंट स्कॅनरने सिक्युर करु शकतात. कंपनीकडून येणाऱ्या काळात अनेक फीचर लाँच करण्यात येणार आहे. सेल्फ डिस्ट्रक्टिंग मेसेज, डार्क मोड, मल्टीपल डिव्हाईस सपोर्ट आणि हायड म्यूटेड स्टेटसचा समावेश असेल. सध्या या फीचरची तपासणी सुरु असून लवकरच लाँच केले जाणार आहे.