
जिओने आणले आपल्या युझर्ससाठी धमाकेदार प्लॅन
जर तुम्ही जिओ फोन युजर असाल तर कंपनीने तुमच्यासाठी खास प्लॅन आणले आहेत. या सर्व प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला हाय स्पीड डेटा आणि जिओ-टू-जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी तुम्हाला एफयूपी मिनिट पॅक रिचार्ज करावा लागेल. जिओ फोनच्या या प्रीपेड प्लॅन्सबद्दल जाणून घेऊया.
75 रुपयांचा प्लॅन –
जिओ फोनसाठी असलेल्या या प्लॅनमध्ये 3 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनचा कालावधी 28 दिवसांचा असून, हा एक ऑल इन वन प्लॅन आहे. या प्लॅन अंतर्गत जिओ ते जिओ अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा मिळेल. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 500 मिनिटे मिळतील.

125 रुपयांचा प्लॅन –
या प्लॅन अंतर्गत जिओ ते जिओ अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा मिळेल. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 500 मिनिटे मिळतील. या प्लॅनचा कालावधी 28 दिवसांचा असून, यात 14 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये 300 मेसेज देखील मिळतात.

155 रुपयांचा प्लॅन –
या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून, यात दररोज 1 जीबी डेटा मिळेल. यामध्ये अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 500 मिनिटे मिळतील.

185 रुपयांचा प्लॅन –
या प्लॅनची वैधता 56 दिवसांची असून, यामध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला अन्य नेटवर्कवर कॉलिंगची अनलिमिटेड सेवा मिळेल तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 500 मिनिटे मिळतील.