300 किमी मायलेज देईल टाटाची ही एसयूव्ही
भारतात सध्या इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढत चालली आहे. काही दिवसांपुर्वीच ह्युंडाईने कोना ही एसयुव्ही लाँच केली होती. तर टाटा मोटर्सने नवीन टिगोरत अनेक बदल करत पुन्हा लाँच केली होती. आता कंपनी आपली लोकप्रिय एसयूव्ही नेक्सॉनचे इलेक्ट्रिक मॉडेल बाजारात आणणार आहे.
300 किमी मायलेज –
टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिकल नेक्सॉनमध्ये झिप्ट्रॉन टेक्निकचा वापर करण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, एमजी हेक्टर, किआ सेल्टॉस आणि वेन्यू प्रमाणेच नेक्सॉन ईव्ही देखील कनेक्टेड कार असून, यामध्ये 30 पेक्षा अधिक उपयोगी स्मार्ट फीचर्स मिळतील. याशिवाय कंपनीने दावा केला आहे की, कार 300 किमी मायलेज देईल.
किंमत –
सांगण्यात येत आहे की, नेक्सॉन ईव्हीची किंमत ही 15ते 17 लाख रूपयांच्या दरम्यान असेल. नेक्सॉन 2020 च्या सुरूवातीला लाँच होण्याची शक्यता आहे.
60 मिनिटात 80 टक्के बॅटरी चार्ज –
खास गोष्ट म्हणजे या कारमध्ये बॅटरी चार्ज होण्यासाठी तासंतास वाट पाहण्याची गरज नाही. ही कार 60 मिनिटांमध्ये 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल. कंपनीने कारची बॅटरी 10 लाख किमी पेक्षा अधिक टेस्ट केले आहे आणि कंपनी यावर 8 वर्षांची वॉरंटी देखील देईल.
अतिरिक्त चार्जिंग पोर्टची गरज नाही –
नेक्सॉन ईव्हीमध्ये पर्मेंनट मॅग्नेट एसी मोटर असेल, जे टॉर्क चांगले देईल. त्यामुळे बॅटरी देखील लवकर ट्रेन होणार नाही. या एसयुव्हीला 15 एंपीयरच्या पॉवर आउटलेटद्वारे देखील चार्ज केले जाऊ शकते. यासाठी अतिरिक्त चार्जिंग पोर्ट लावण्याची गरज नाही.