ओपन चॅलेंज देणाऱ्या झरीनला मेरी कोमने दाखवले आस्मान

frame ओपन चॅलेंज देणाऱ्या झरीनला मेरी कोमने दाखवले आस्मान

Thote Shubham

नवी दिल्ली – सहावेळची जागतिक विजेती एम. सी. मेरी कोम हिने ऑलिम्पिक पात्रता निवड चाचणीतील बहुचर्चित लढतीमध्ये जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील माजी कनिष्ठ विजेती निखत झरीनला पराभूत केले. मेरी कोमचा ऑलिम्पिक पात्रतेसाठी तिकीट मिळण्याचा मार्ग या विजयामुळे मोकळा झाला आहे. दुसरीकडे झरीनचा या पराभवामुळे ऑलिम्पिकमध्ये खेळण्याच्या स्वप्नाचा चक्काचुरा झाला आहे. शनिवारी मेरी कोमने झरीनला महिला बॉक्सिंगच्या ५१ किलो वजनी गटातील अंतिम फेरीत ९-१ अशा फरकाने पराभूत केले आहे.

 

निखत झरीनने दोन दिवसांच्या निवड चाचणीतील पहिल्या दिवशी राष्ट्रीय विजेच्या ज्योती गुलियाला १०-० अशा फरकाने पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. तर मेरी कोमने रितू ग्रेवालला १०-० असे एकहाती पराभूत करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. टोकिया ऑलिम्पिकसाठी बॉक्सिंग खेळाडूंची निवड चाचणी निपक्षपाती व्हावी, अशी इच्छा जागतिक कनिष्ठ स्पर्धेची माजी विजेती निखत झरीन हिने व्यक्त केली होती. 

 

यासाठी ऑलिम्पिक निवड चाचणीवेळीच्या लढतींचे थेट प्रेक्षपण दाखवावे, अशी मागणी तिने राष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडे केली होती. या भूमिकेतून तिने बॉक्सिंग महासंघाच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या निवड प्रक्रियेवर संशय व्यक्त केला होता.

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More