सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा श्रेणीत कपात, तर आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा
भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडलूकरची ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा श्रेणीत कपात करण्यात येत असे, ती आता राज्य सरकारकडून काढून घेण्यात आली आहे. तर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘वाय+’ वरून आता ‘झेड’ दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. राज्य सरकारने 45 जणांच्या सुरक्षेमध्ये बदल केले आहेत.
याशिवाय भाजप नेते एकनाथ खडसे यांना ‘वाय’ सुरक्षा श्रेणी आणि एस्कॉर्ट संरक्षण होते. मात्र आता त्यांना केवळ ‘वाय’ सुरक्षा श्रेणी मिळेल. तसेच उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना ‘झेड+’ वरून ‘एक्स’ आणि वकिल उज्जवल निकम यांना ‘झेड+’ वरून वाय सुरक्षा श्रेणीसह एस्कॉर्ट सुरक्षा देण्यात येणार आहे.
अण्णा हजारे यांच्या सुरक्षा श्रेणीत वाढ करण्यात आली असून, त्यांना ‘वाय+’ वरून आता ‘झेड’ दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे.