‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या दशकातील सर्वोत्तम संघांच्या कर्णधारपदी भारतीय क्रिकेटपटू

Thote Shubham

मेलबर्न : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. धोनीची ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तर दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाच्या कर्णधारपदी विराट कोहलीची निवड करण्यात आली आहे.

 

मंगळवारी दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय आणि कसोटी संघाची ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने घोषणा केली. एकदिवसीय संघामध्ये तीन भारतीय क्रिकेटपटूंना स्थान देण्यात आले आहे. धोनीसोबतच ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांचा संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. या यादीत मिशेल स्टार्क हा एकमेव ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे.

 

‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या एकदिवसीय संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी धोनीकडे सोपवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलासोबत रोहित शर्मा सलामीवीर आहे. तर कोहली नेहमीप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आहे. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या दशकातील सर्वोत्तम संघाची निवड ज्येष्ठ पत्रकार मार्टिन स्मिथ यांनी केलेली आहे. धोनी हा भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सुवर्णकाळाचा महत्त्वाचा मोहरा असल्याचे स्मिथ म्हणतात.

 

आपल्या देशाला घरच्या मैदानावर 2011 मध्ये विश्वचषक जिंकून देण्यासाठी धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने मोलाची कामगिरी बजावली. भारताचा धोनी हा सर्वोत्तम ‘फिनिशर’ असल्याचेही मार्टिन स्मिथ लिहितात. विराट कोहलीलाही दशकातील “सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज” म्हणून मार्टिन स्मिथ यांनी संबोधले आहे.

दशकातील ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चा सर्वोत्तम एकदिवसीय संघ

  • महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक) (भारत)
  • रोहित शर्मा (भारत)
  • हाशिम आमला (द. आफ्रिका)
  • विराट कोहली (भारत)
  • एबी डिव्हिलियर्स (द. आफ्रिका)
  • साकिब अल हसन (बांगलादेश)
  • जॉस बटलर (इंग्लंड)
  • राशिद खान (अफगाणिस्तान)
  • मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
  • ट्रेंट बाउल्ट (न्यूझीलंड)
  • लसिथ मलिंगा (श्रीलंका)

दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली हा ठरला असून आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम कसोटी संघात स्थान मिळवणारा कोहली हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या दोन्ही संघात कोहलीची वर्णी लागली आहे.

 

दशकातील ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चा सर्वोत्तम कसोटी संघ

  • विराट कोहली (कर्णधार)
  • अॅलिस्टर कुक (इंग्लंड)
  • डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
  • केन विल्यमसन (न्यूझीलंड)
  • स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
  • एबी डीव्हिलियर्स (दक्षिण अफ्रिका) (यष्टिरक्षक)
  • बेन स्टोक्स (इंग्लंड)
  • डेल स्टेन (दक्षिण अफ्रिका)
  • स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)
  • नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया)
  • जेम्स अँडरसन (इंग्लंड)

Find Out More:

Related Articles: